शूर अम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती !

जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !

गीत : शांता शेळके 
चित्रपट : मराठा  तितुका मेळवावा 

Comments

Popular posts from this blog

गोरी गोरी पान

श्रावण मासी हर्ष मानसी

आनंदी आनंद गडे