आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे,
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे,
कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने,
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती,
डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे,
कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

Comments

Popular posts from this blog

गोरी गोरी पान

श्रावण मासी हर्ष मानसी