गोरी गोरी पान
गोरी गोरी पान गोरी गोरी पान । फुलासारखी छान । दादा ! मला एक वहिनी आण ॥धृ॥ गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याचा पदराला बिजलीचा हार दादा ! मला एक वहिनी आण ॥१॥ वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी हरिणाची गाडी, तुडवी गुलाबाचे रान दादा ! मला एक वहिनी आण ॥२॥ वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परि होऊ दोघे आम्ही स्वार दादा ! मला एक वहिनी आण ॥३॥