Posts

गोरी गोरी पान

गोरी गोरी पान गोरी गोरी पान । फुलासारखी छान । दादा ! मला एक वहिनी आण ॥धृ॥ गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याचा पदराला बिजलीचा हार दादा ! मला एक वहिनी आण ॥१॥ वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी हरिणाची गाडी, तुडवी गुलाबाचे रान दादा ! मला एक वहिनी आण ॥२॥ वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परि होऊ दोघे आम्ही स्वार दादा ! मला एक वहिनी आण ॥३॥

श्रावण मासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे  श्रावण महिन्याचे गीत - बालकवी 
सर ओळखलात का सर मला पावसात आला कोणी.. कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पुन्हा.. गंगमाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली.. मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली भिंत खचली , चूल भिजली, होते नव्हते नेले.. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे.. चिखल गाल काढतो आहे ,पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातच, हसत हसत उठला.. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा.. पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा गीत : कवी कुसुमाग्रज
शूर अम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती ! आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती ! जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती ! गीत : शांता शेळके  चित्रपट : मराठा  तितुका मेळवावा 

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे
गवतफुला -  इंदिरा संत रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला; असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना; तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना. विसरुनी गेलो पतंग नभिचा; विसरुन गेलो मित्राला; पाहुन तुजला हरवुन गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजुला सळसळती; नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहुनही लहान रे; तुझ्या संगती सदा रहावे, विसरुन शाळा,घर सारे.