गवतफुला - इंदिरा संत रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला; असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना; तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना. विसरुनी गेलो पतंग नभिचा; विसरुन गेलो मित्राला; पाहुन तुजला हरवुन गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजुला सळसळती; नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहुनही लहान रे; तुझ्या संगती सदा रहावे, विसरुन शाळा,घर सारे.
Posts
Showing posts from 2016