गोरी गोरी पान

गोरी गोरी पान


गोरी गोरी पान । फुलासारखी छान ।
दादा ! मला एक वहिनी आण ॥धृ॥
गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी
चांदण्याचा पदराला बिजलीचा हार
दादा ! मला एक वहिनी आण ॥१॥
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी
हरिणाची गाडी, तुडवी गुलाबाचे रान
दादा ! मला एक वहिनी आण ॥२॥
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परि होऊ दोघे आम्ही स्वार
दादा ! मला एक वहिनी आण ॥३॥

Comments

Popular posts from this blog

श्रावण मासी हर्ष मानसी

आनंदी आनंद गडे